खिडकीतून पाहताना....

स्थानबद्धता सुसह्य करण्यात खिडकीतून खुणावणारा निसर्गाचा हिरवा साज मोठाच हातभार लावत असतो. अगदी निसर्गाशी फारशी जवळीक नसणाऱ्या लोकांनी सुद्धा अशी काही क्षण कल्पना करून पहावी की खिडकीतून फक्त दुसऱ्या इमारतीच दिसत असतील तर कसे वाटेल..! चला तर मग माझ्या सोबत बाहेर काय दिसतंय ते न्याहाळायला......
हा हे माझ्या बाल्कनीतून दिसणारा असुपालव. हा अशोक नाहीये. अनेकदा आपण ती गल्लत करतो. सीता अशोक वेगळा असतो....

खिडकीतून दिसणारे शेजारच्या आवारातील अनुक्रमे देशी बदाम, निलगिरी (याची पाने खाली पडलेली मिळाली तर जरा चुरडून नाकाला लाऊन बघाच!) व सोनचाफा

सोनचाफा - फुले आली की वाऱ्याच्या झुळूके बरोबर येणारा याचा सुवास अविस्मरणीय असतो....

फणस

जिन्यातील दृश्य - वसंत ऋतूच्या स्वागतासाठी फुललेला नीलमोहर...!

दाटीवाटीने उभे असलेले आंबा व भेरली माड

बाल्कनीतील कोरफड

कुंडीत उगवलेले एक धान्य गवत

बाल्कनीतील सदाफुली

आरोग्यदायी तुळस......

Comments

Ttt said…
वा अतुल छान वर्णन केले आहे 👌👌👌
Atul Sathe said…
अभिप्रायाबद्दल धन्यवाद...
Vighnesh said…
Khup maast Atul ... feeling good ��
Atul Sathe said…
अभिप्रायाबद्दल आभार विघ्नेश. लेख वाचून तुला आनंदानुभूती मिळाली हे वाचून बरे वाटले...

Popular posts from this blog

स्वातंत्र्य

मी अनुभवलेली महाराष्ट्रातील वन्यजीव विविधता

Spring time on Shilonda trail ..