ध्वनी कल्लोळ
--- अतुल साठे
माणूस साधतोय वेगाने प्रगती,
आवाज आहे आता निरंतर सोबती.
राम
प्रहर ते विश्राम प्रहर,
ध्वनी
प्रदूषणाचा झालाय कहर.
डोळे उघडता गजराची रिंग,
पुढच्या क्षणी व्हॉट्सअॅपची पिंग.
रस्त्यांवर
सुरु “टरटर” रिक्षांचे,
पाठोपाठ
“धडाम” कचरा डंपरचे.
कुत्र्यागत भुंके हॉर्न रिव्हर्सचा,
ठणठणाट लिफ्टच्या उघड्या दाराचा.
युव्ही
फिल्टरच्या शिट्ट्या पाच,
उघडलेल्या
फ्रिजची किणकिण उगाच.
सिग्नल लागला तरी भोंगा वाजवणार,
थोराड फटफट्या उगीच दरडावणार.
फालतू
सूचनांचा ट्रेनमध्ये भडीमार,
मोटरमनच्या
किंकाळीने बाजूचे दचकणार.
हँड्सफ्री असूनही स्पीकरवर गाणी,
टोळक्यांचे “भजन” गाडीत उच्छाद आणी.
काहींकडे
पैसा झालाय फार,
मार्बल
कटिंगने कान बेजार.
तेचतेच रस्ते आम्ही नियमित उखडतो,
ड्रिल व काँक्रिट मिक्सर झोप उडवतो.
सर्वपंथीय
कर्णे मारती हाक देवाला,
शांततेतला
भगवंत कुठेतरी हरवला.
गर्जते राजकीय शक्तीप्रदर्शन,
घडवा रे यांना कुणी योग दर्शन.
कर्कश फटाक्याने बसे कांठळी,
सुंदर सणांची मजा घालवली.
लग्न केले, जणू दिवेच लावले,
वरातीच्या बँजोने कान किटले.
ऑफिसातही
शांतता नसते,
फॅक्स
व प्रिंटरची खरखर चालते.
एकवटली वस्ती काही शहरांत,
वाढत्या गाड्यांचा होणारच गोंगाट.
सुज्ञपणा
जसा कमी होतोय,
आवाज
सुबत्तेचे लक्षण ठरतोय.
हे लोण आता गावांत पसरताय,
पक्ष्यांची किलबिल हेरावून घेताय.
आजारी
पडण्या आधी होऊया जागे,
ध्वनी
कल्लोळातून आपण मुक्त व्हावे!
Comments