माथ्यावरचं रान
मुंबईकरास खुणावती डोंगरवाटा हिरव्या,
धकाधकीतून या थोडी सवड काढूया.
नेरळ पासून पुढे चिमुकली आगगाडी,
साद घालू लागे माथ्यावरची झाडी.
नागमोडी वाटेवर सावरी आणि सागवान,
पर्वत चढल्यावर दाट अंजनीचे रान.
स्वागतास अंथरले लाल मातीचे गालिचे,
संगतीस असती स्वर श्यामा पक्ष्याचे.
नाही गोंगाट इथे कोणत्या वाहनांचा,
निसर्ग घेई ताबा नकळत मनाचा.
घोड्यांच्या टापांचा मधूनच आवाज,
सोबतीला सळसळत्या पानांची गाज.
शारलॉट तलाव दडलाय अरण्यात,
बाजूच्या राईत ग्रामदैवत पिसारनाथ.
जवळच असे बाजारपेठ टुमदार,
रंगवलेले गवत व चिक्की चटकदार.
निरनिराळ्या पॉइंटवरून विहंगम दृश्य,
अनुभूती आनंदाची शांत अदृश्य.
दूरवर शोभती प्रबळगड, इरशाळ,
सुखद गारव्याची सुंदर सकाळ.
दरीत पहुडला मोरबे जलाशय,
कड्यावर तरंगत गरुड महाशय.
चालता रानवाटा हात हाती धरून,
मिळे मोकळा श्वास विचार मागे सारून.
वनदेवतेचा एक रम्य अविष्कार,
तरु-लतांनी नटलेले माथेरान पठार!
--- अतुल साठे (© सर्व प्रकाशन हक्क लेखकाकडे - संपर्क atulsathe@yahoo.com )
धकाधकीतून या थोडी सवड काढूया.
नेरळ पासून पुढे चिमुकली आगगाडी,
साद घालू लागे माथ्यावरची झाडी.
नागमोडी वाटेवर सावरी आणि सागवान,
पर्वत चढल्यावर दाट अंजनीचे रान.
स्वागतास अंथरले लाल मातीचे गालिचे,
संगतीस असती स्वर श्यामा पक्ष्याचे.
नाही गोंगाट इथे कोणत्या वाहनांचा,
निसर्ग घेई ताबा नकळत मनाचा.
घोड्यांच्या टापांचा मधूनच आवाज,
सोबतीला सळसळत्या पानांची गाज.
शारलॉट तलाव दडलाय अरण्यात,
बाजूच्या राईत ग्रामदैवत पिसारनाथ.
जवळच असे बाजारपेठ टुमदार,
रंगवलेले गवत व चिक्की चटकदार.
निरनिराळ्या पॉइंटवरून विहंगम दृश्य,
अनुभूती आनंदाची शांत अदृश्य.
दूरवर शोभती प्रबळगड, इरशाळ,
सुखद गारव्याची सुंदर सकाळ.
दरीत पहुडला मोरबे जलाशय,
कड्यावर तरंगत गरुड महाशय.
चालता रानवाटा हात हाती धरून,
मिळे मोकळा श्वास विचार मागे सारून.
वनदेवतेचा एक रम्य अविष्कार,
तरु-लतांनी नटलेले माथेरान पठार!
--- अतुल साठे (© सर्व प्रकाशन हक्क लेखकाकडे - संपर्क atulsathe@yahoo.com )
Comments