लोकलच्या खिडकीतून....

शिवाजी टर्मिनसहून निघाली लोकल,
विजेच्या वेगाने भायखळ्यात दाखल.
गिरणगावातून पुढे अग्रेसर,
स्वामीनारायणासमोर गाठले दादर.
शहराची शीव ओलांडली दणाणत,
कुर्ल्याला आभाळी विमाने लुकलुकत.
उपनगरी वेध लागती घाटकोपरात,
तुरळक झाडी खंडोबाच्या डोंगरात.
लोहमार्गाच्या पूर्वेस सरस्वतीचा विहार,
गोदरेजकारणे मग हिरवळ अपार.
खारफुटी परिसर उगवतीच्या दिशेला,
मुलुंडला रामराम मुंबईच्या वेशीला.
पश्चिमेस शोभे येउर पर्वतराजी,
तलावांचे शहर ओळख श्रीस्थानकाची.
घालून वळसा पारसिक टेकडीला,
नमस्कार माझा मुंब्र्याच्या देवीला.
सुन्द्रीचे वन दिव्याच्या वाटेवर,
बगळ्यांचे थवे खाडीच्या वाऱ्यावर.
संस्कृती आगर जन्मगाव डोंबिवली,
बायकोची ऑर्डर, “उतर, आलं ठाकुर्ली”.
असा होतो प्रवास खिडकीतून बघत,
जाताना सासुरवाडीला रमत गमत.

--- अतुल साठे (© सर्व प्रकाशन हक्क लेखकाच्या हाती - संपर्क atulsathe@yahoo.com )

Comments

Raju Kasambe said…
I liked the poem very much. You need to love the city to write such nice poems. Hearty congrats for the poem. It gave me lot of happiness.

Popular posts from this blog

स्वातंत्र्य

मी अनुभवलेली महाराष्ट्रातील वन्यजीव विविधता

Spring time on Shilonda trail ..