शिशिरातील दुपार
अतुल साठे
सरत्या शिशिरातील शांत दुपार,
कलत्या सूर्याची किरणे उबदार.
हॉर्नबिल हाउसची दगडी इमारत,
काम करताना हाती वाफाळता कप.
अशा शुक्रवारी एकदा निघालो लवकर,
वाऱ्याची झुळूक, स्वच्छ निळे अंबर.
महोगनी व पिंपळ, पानांची सळसळ,
सुट्टीची चाहूल, गर्दी तशी विरळ.
सुवर्णपर्ण वृक्ष उन्हात न्याहाळत,
काळाघोडापाशी आलो रमत-गमत.
विद्यापीठ, न्यायालय दिमाखात उभे,
रस्त्यापल्याड ओव्हल मैदान शोभे.
लाल फळांनी नटले रानबदाम तरुवर,
भरपूर पानगळ करती सोनमोहर.
राजाभाई टॉवरचे ऐकू येती टोले,
फांदीवरील खंड्या मजेत शीळ घाले.
संध्याकाळच्या धावपळीला अजून असे अवकाश,
रेल्वेच्या खिडकीत सहज बसलो सावकाश.
अवचित लाभते असे स्वास्थ्य अपार,
सुखावह अशी शिशिरातील दुपार.
(© सर्व हक्क लेखकाकडे. संपर्क atulsathe@yahoo.com )
सरत्या शिशिरातील शांत दुपार,
कलत्या सूर्याची किरणे उबदार.
हॉर्नबिल हाउसची दगडी इमारत,
काम करताना हाती वाफाळता कप.
अशा शुक्रवारी एकदा निघालो लवकर,
वाऱ्याची झुळूक, स्वच्छ निळे अंबर.
महोगनी व पिंपळ, पानांची सळसळ,
सुट्टीची चाहूल, गर्दी तशी विरळ.
सुवर्णपर्ण वृक्ष उन्हात न्याहाळत,
काळाघोडापाशी आलो रमत-गमत.
विद्यापीठ, न्यायालय दिमाखात उभे,
रस्त्यापल्याड ओव्हल मैदान शोभे.
लाल फळांनी नटले रानबदाम तरुवर,
भरपूर पानगळ करती सोनमोहर.
राजाभाई टॉवरचे ऐकू येती टोले,
फांदीवरील खंड्या मजेत शीळ घाले.
संध्याकाळच्या धावपळीला अजून असे अवकाश,
रेल्वेच्या खिडकीत सहज बसलो सावकाश.
अवचित लाभते असे स्वास्थ्य अपार,
सुखावह अशी शिशिरातील दुपार.
(© सर्व हक्क लेखकाकडे. संपर्क atulsathe@yahoo.com )
Comments