स्वातंत्र्य

विचारांचं, आचारांचं स्वातंत्र्य,
नाही गुलामी, नाही पारतंत्र्य.

स्वातंत्र्य मोकळा श्वास घेण्याचं,
स्वातंत्र्य शुद्ध पाणी पिण्याचं.

रसायन विरहित अन्न खाण्याचं,
टुमदार वस्त्यांमध्ये राहण्याचं.

गुणानुरूप व्यवसाय निवडण्याचं,
खाऊन-पिऊन सुखात जगण्याचं.

निसर्ग सान्निध्याचं स्वातंत्र्य,
नाही प्रदूषणाचं पारतंत्र्य.

स्वातंत्र्य शासक ठरवण्याचं,
स्वातंत्र्य रामराज्य पाहण्याचं.

शिवाजी महाराजांच्या मनातलं,
तुमच्या आमच्या स्वप्नातलं.

भारतभूच्या प्रारब्धातलं,
साधू संतांच्या वचनातलं.

गीतेत वर्णिलेलं स्वातंत्र्य,
नाही दहशतीतचं पारतंत्र्य.

स्वातंत्र्य पुरुषार्थ करण्याचं,
स्वातंत्र्य आनंद शोधण्याचं.

आळस, नैराश्यातून मुक्ति,
न्यूनगंडाच्या विळख्यातून मुक्ति.

मुक्ति भयाण स्पर्धेतून,
झापडं लावून धावण्यातून.

स्वच्छ दृष्टीकोनाचं स्वातंत्र्य,
संतुलित आयुष्याचं स्वातंत्र्य.

स्वातंत्र्य दिर्घायुरोग्याचं,
स्वातंत्र्य सत्य जाणण्याचं.

मर्यादेत उपभोग घेण्याचं,
कर्तव्याने वागण्याचं.

हिच देवाकडे इच्छा,
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

--- अतुल साठे (© सर्व प्रकाशन हक्क लेखकाकडे - संपर्क atulsathe@yahoo.com )

Comments

Abhijit said…
अतिशय अर्थपूर्ण. सुंदर शब्दांकन. अभिजित
ketan said…
sundar kavita happy independence day!!!!!
Mohan Sule said…
nice thoughts put across lyrically!

mohan

Popular posts from this blog

मी अनुभवलेली महाराष्ट्रातील वन्यजीव विविधता

Spring time on Shilonda trail ..