Posts

Showing posts from March, 2020

खिडकीतून पाहताना....

Image
स्थानबद्धता सुसह्य करण्यात खिडकीतून खुणावणारा निसर्गाचा हिरवा साज मोठाच हातभार लावत असतो. अगदी निसर्गाशी फारशी जवळीक नसणाऱ्या लोकांनी सुद्धा अशी काही क्षण कल्पना करून पहावी की खिडकीतून फक्त दुसऱ्या इमारतीच दिसत असतील तर कसे वाटेल..! चला तर मग माझ्या सोबत बाहेर काय दिसतंय ते न्याहाळायला...... हा हे माझ्या बाल्कनीतून दिसणारा असुपालव. हा अशोक नाहीये. अनेकदा आपण ती गल्लत करतो. सीता अशोक वेगळा असतो.... खिडकीतून दिसणारे शेजारच्या आवारातील अनुक्रमे देशी बदाम, निलगिरी (याची पाने खाली पडलेली मिळाली तर जरा चुरडून नाकाला लाऊन बघाच!) व सोनचाफा सोनचाफा - फुले आली की वाऱ्याच्या झुळूके बरोबर येणारा याचा सुवास अविस्मरणीय असतो.... फणस जिन्यातील दृश्य - वसंत ऋतूच्या स्वागतासाठी फुललेला नीलमोहर...! दाटीवाटीने उभे असलेले आंबा व भेरली माड बाल्कनीतील कोरफड कुंडीत उगवलेले एक धान्य गवत बाल्कनीतील सदाफुली आरोग्यदायी तुळस......

स्थानबद्धते (Lockdown) मधील पहाट

Image
तसे पाहिले तर पहाट रोजच होते आणि ती रम्यच असते. परंतु लवकर उठून वाहन पकडून कार्यालयात जायच्या घाईत रोज तिच्या रम्यतेचा अनुभव घेता येतोच असे नाही. सध्या आपण सगळे स्थानबद्धतेत असल्याने आवरून कुठे जायचे नाहीये आणि घरून काम करायचे असले तरी प्रवासाचा वेळ वाचतोय. त्यामुळे तात्पर्य असे की आज पहाटे ५ ला जागा झालो तेव्हा या मंगल समयाची अनुभूती घ्यायला सवड होती.   प्रतिकात्मक छायाचित्र - अतुल साठे (स्थळ अंबेजोगाई) अंधारात सर्वात प्रथम ओरडले ते कोकीळ व कोकिळा. वसंत ऋतू (पाडवा झाला म्हणून असे म्हणायचे - अन्यथा हा कोणता ऋतू आहे हे यावेळी कळतच नाहीये कारण कालच पुण्यात पाऊस पडला!!) सुरु झाल्याचे लक्षण. विणीच्या हंगामातील नराचे सुरेल स्वर व मादीचे कर्कश्श केकाटणे असे दोन्ही प्रकार ऐकायला मिळाले. शहरात इमारतींना खेटून असलेल्या झाडांवर कोकीळचे ओरडणे अंमळ मोठेच वाटते, विशेषतः पहाटेच्या निरव शांततेत. दुसरा लक्षात आलेला आवाज होता नारद बुलबुलांचा. माझा मेव्हणा याच्या आवाजाचे वर्णन करताना म्हणतो की बुलबुल इंग्रजीतील 'इंटरव्ह्यू' हा शब्द म्हणतोय असे वाटते. मला हे वर्णन मनोनन पटते. शिवाय बु...

तुकतुकीत कांतीचे काळवीट

Image
--- अतुल साठे डोक्यावर इंग्रजी V आकारात सरळ वाढलेली स्क्रू सारखी २ शिंगे व तुकतुकीत काळी कांती असलेले कुरंग गटातील काळवीट माळरानावर चरताना किंवा धावताना अतिशय सुंदर दिसते. पूर्वी भारतात अस्तित्वात असलेल्या चित्त्याचे ते मुख्य भक्ष्य होते. शेगाव, परतवाडा, अंबेजोगाई, नान्नज, हिप्परगा व कोडेकराई (तमिळ नाडू) अशा भिन्न परिसरांत मला त्याचे दर्शन झाले आहे. हिप्परगा तलावा जवळ एक-एक करत अख्खा कळप जमा होताना दिसला. परतवाडा व शेगावला शेतात, तर नान्नज व कोडेकराईला नैसर्गिक अधिवासात पाहिली. अंबेजोगाईतील मुकुंदराज समाधी समोरच्या पठारावर आपल्या रंगसंगतीमुळे बेमालूमपणे वावरणाऱ्या काळवीट माद्या बारकाईने निरखल्यावरच दिसल्या होत्या. उष्णकटिबंधातील भारतीय उपखंडातच सापडत असल्याने ही प्रदेशनिष्ठ प्रजाती आहे. देशात हिमालय, सह्याद्री व ईशान्ये कडील भाग सोडला तर बहुतांश राज्यांत जिथे माळराने व गवताळ प्रदेश असलेली खुरटी शुष्क जंगले शिल्लक आहेत, तिथे काळवीट आढळतात. त्यांना नियमितपणे पाणी लागते, ज्यासाठी ती बराच प्रवास करू शकतात. परंतु वाळवंटी भागात ती आढळत नाहीत. उत्तर व वायव्य भारतात एक उपप्र...