जंगलेतर नैसर्गिक अधिवास.....

विविध प्रकारची जंगले हे भारताचे एक वैशिष्ठ्य आहे. मागच्या पोस्ट मध्ये आपण अशा काही जंगल अधिवासांचे फोटो पाहिले. आज घेऊया झलक महाराष्ट्रातील काही जंगलेत्तर अधिवासांची. जंगले तर महत्वाची आहेतच, पण अनेकदा लोकांचा असा समाज असतो की जंगल नसलेले ठिकाण हा महत्वाचा अधिवास असू शकत नाही. वास्तवात असे अधिवास सुद्धा किती वैविध्यपूर्ण व समृद्ध असतात याची थोडी माहिती घेऊया छायाचित्रांच्या माध्यमातून. शेती (विशेषतः पारंपारिक शेती) हा एक अधिवास असतो. शेताच्या बांधावर असलेली झाडे अनेक प्रकारच्या पक्ष्यांना आकर्षित करतात. यातील अनेक पक्षी शेतावरील कीटकांना खाऊन शेतकऱ्याला मदत करतात. पारंपारिक शेतीत बांधावर कोणती झाडे लावावीत याचेही ज्ञान शेतकऱ्यांना असते. शिवाय बऱ्याचदा शेताला लागूनच जंगल किंवा अन्य नैसर्गिक अधिवास असतो ज्यामुळे शेत सुद्धा त्याचाच भाग बनते. वरील फोटो कोकण रेल्वेने प्रवास करताना चिपळूण व कुडाळ यांच्या दरम्यान कुठेतरी काढला आहे. सामान्यपणे घनदाट झाडे असल्याशिवाय लोकांना एखादा प्रदेश जंगलाने आच्छादलेला आहे असे वाटत नाही. परंतु कमी पावसाच्या प्रदेशांत खुरटी किंवा काटेरी राने हा एक महत्वाचा अ...