नवलाईच्या देशात नव्वद दिवस...!

माझे आजोबा (स्व. त्र्यंबक महादेव गोडबोले - अण्णा) यांनी त्यांच्या 36 वर्षांपूर्वीच्या अमेरिका प्रवासाचे 1986 साली लिहिलेले वर्णन इथे जोडत आहे. लेख मोठा आहे, पण, प्रवास वर्णन व समाज वर्णन आवडणाऱ्या लोकांना भावेल असे वाटते. एका भारताभिमानी माणसाच्या नजरेतून केलेले अमेरिकेचे अवलोकन - जे आवडले त्याची तोंड भरून स्तुती, जे खटकले त्याच्यावर परखड मत. त्यात वर्णन केलेल्या अनेक गोष्टी आजच्या भारतात सर्रास अनुभवास येतात, पण तेव्हा तसे नव्हते....